Tuesday, April 20, 2010

"कॉलेज लाइफ़ "


"कॉलेज लाइफ़ ".,.,.,.
कॉलेज लाइफ़ "
कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती

Friday, April 16, 2010

मुले मंदिरात का जातात...?

मुले मंदिरात का जातात...?
मुले मंदिरात का जातात...?
कारण मंदिर हि एकच जागा आहे जिथे मुलांना मिळते......





पुजा....


भावना.....


श्रद्धा........


आरती.......


अर्चना...........


आराधना..............


शांती.........


ज्योती................


दिप्ती...............


भक्ती.............


शेवटी तॄप्ती..........


आणी मग मुक्ती


Wednesday, April 14, 2010

हाच तर जिवलग मित्र असतो..........


१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
कोलेजला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो
काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो
इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो
हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो
हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो
दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का...? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो.........