Saturday, May 21, 2011

शब्द ह्रदय जोडुन जातात......


शब्द ह्रदय जोडुन जातात,

शब्द ह्रदय तोडुन जातात,

शब्द कधी काहीही न करता मोठा खेळ खेळून जातात,

शब्द कधी विषारी होतात आणि नाते तोडुन टाकतात,

शब्द मर्यादा न बाळगता कधी काहीही बोलुन जातात,

शब्द कधी मनामध्ये काट्यांचे घर बनवून जातात,

शब्द एखादा ऎकण्यासाठी कान जन्मभर वाट पाहतात,

शब्द शब्द लिहता आयुष्याची पाने उलटून जातात,

शब्दांबद्दल किती लिहावं…?


…शब्दच अपूरे पडुन जातात”

Monday, May 16, 2011

एक होती गुलाबी कळी ..

एक होती गुलाबी कळी
पुष्पकोषात पहुडलेली , नुकतीच जन्मलेली
पाकळ्यांची लोचने सुदधा न उघडलेली.

सकाळ होताच,
गुलाल उधळीत रविराजांची स्वारी आली.
फ़ांद्यांच्या गर्दीतून, पानांच्या दाटीवाटीतुन
मार्ग काढीत गुलाबी किरणे चहूकडे पसरली,
सगळ्यांना उठा-उठा करु लागली

निपचीत पडलेली कळी डोळे किलकिले करुन पाहु लागली;
कोणत्या बरे राजाची स्वारी आली?
सर्वाना विचारु लागली.

तेवढ्यात पानांच्या आडुन, फ़ांद्यांच्या पसारयातुन ,
तिला त्या रविराजांचे दर्शन घडले;
त्या लालगुलाबी सुर्याचे रुपा तिच्या मनात भरले !

पानांनी समजले, फ़ांद्यांनी अडवले,
पण कळीने कुणा कुणाचे नाही ऐकले.
पुष्पकोषाची बंधने दुर सारुन, सर्वाचे मन मोडुन,
कळीने आपले पंख पसरले !
कळीचे फ़ुलात रुपांतर झाले.

त्या गुलाबी स्पर्शाने कळी मोहरली.
त्या सुवर्ण स्पर्शासाठी ती आसुसली.
लाजुन अगदी लालेलाल झाली.
त्या आदित्याला भेटायला कळी पुर्ण उमलली

रविराजही मग आले मध्यावर किरणांच्या लावाजाम्यासह
आपले तेजस्वी रुप दाखवायला,
त्यांच्यावर भाळलेल्या कळीला जवळुन पहायला

कळी राहीली नव्हती आता कळी
तिचे केव्हाच झाले होते फूल
तिचे ते सुंदर सुहास्य सर्वाना घालीत होते भुल !!

सुर्यदेव अगदी मध्यावर् आले कळी सुदधा तयारीतच होती !!

पण हाय! त्या सुर्यराजांच्या किरणांची
कळीला झळ लागली.............

त्या तप्त किरणांची तिच्या अंगाची लाही लाही झाली
ती पानांचा आडोसा, फ़ांद्यांचा आसरा मागु लागली,

पण कुणीही आले नाही मदतीला,
"बरं झालं, असच पाहिजे !" असं म्हणु लागले सगळे कळीला

कळी बिचारी रडु लागली,
रडुन रडुन तिला धाप लागली
तिची रंग रंगोटी केव्हाच उतरली,
दमुन भागुन तिनं मान टाकली

शेवटी दया आली सुर्यदेवाला
त्यांनी ठरवले आता आपणच जाऊया अस्ताला
तेजस्वी रुप ते दुःखाने लालेलाल झाले
कळीला कुरवाळीत अस्ताला गेले!!

प्रेमात असंही होते
हे कळीला माहीत नव्ह्ते ...
कुणाच्या वाट्यला गुलाब असतात
तर कुणाच्या वाट्यला नुसतेच काटे !

Wednesday, May 11, 2011

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे".....


तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेलथाम्ब जरा राहू दे"

तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"
ती म्हणाली " आई रागावतीलदूध उतू गेल तर॥"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवूखाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतूनपाणी यायची तीच वेळ"

"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यातसगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"

आता मात्र तो हिरमुसलाकेली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवतएकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिलीती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।

"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"
"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"

"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास ....
माप ओलांडून आले होतेमी-तू पण तेव्हाच कळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"

Sunday, May 1, 2011

Zindagi hai to Khwaab Hai...

Zindagi hai to Khwaab Hai
_Khwaab Hai To Manzilein Hai
____Manzilein Hai To Fasaley Hai
__________Fasaley Hai To Rastey Hai
_________Rastay Hai To Mushkilein Hai
_____________Mushkilein Hai To Hausla Hai
_________________Hausla Hai To Vishawas Hai
______________________Vishvas hai to Paisa hai
________________________Paisa hai to Shohrat hai
__________________________Shohrat hai to Izzat Hai
______________________________Izzat hai to Ladki hai
__________________________Ladki hai to Tension hai
______________________Tension hai to Concern hai
__________________Concern hai to a Khayaal hai
_________________Khayaal hai to Khwaab hai
______________Khawab hai to Growth hai
__________Growth hai to Zindagi hai
______Zindagi hai to khwaab hai
_Matlab duniya Gol Gol hai
Bas ghumnewala chahiye