Saturday, May 21, 2011

शब्द ह्रदय जोडुन जातात......


शब्द ह्रदय जोडुन जातात,

शब्द ह्रदय तोडुन जातात,

शब्द कधी काहीही न करता मोठा खेळ खेळून जातात,

शब्द कधी विषारी होतात आणि नाते तोडुन टाकतात,

शब्द मर्यादा न बाळगता कधी काहीही बोलुन जातात,

शब्द कधी मनामध्ये काट्यांचे घर बनवून जातात,

शब्द एखादा ऎकण्यासाठी कान जन्मभर वाट पाहतात,

शब्द शब्द लिहता आयुष्याची पाने उलटून जातात,

शब्दांबद्दल किती लिहावं…?


…शब्दच अपूरे पडुन जातात”

No comments:

Post a Comment