Tuesday, November 30, 2010

कुणी तरी असाव, जीवाला जीव देणारं.........

कुणी तरी असाव, जीवाला जीव देणारं
मी संकटात पडल्यावर, मदतीला धावुन येणारं.

कुणी तरी असाव, माझ्या भावना समजणारं,
मी चुकलो तरी, मला समजुन घेणारं.

कुणीतरी असावं माझ सुखदुःख समजणारं,
आपल सुख बाजुला ठेऊन दुःखात सहभागी होणारं.

क़ुणी तरी असावं मला आपलं म्हणणारं,
आपली सुख आणि दुःख मला येऊन सांगणार.

कुणीतरी असावं माझ्या भल्यासाठी लढणारं,
मी चुकल्यावर मला समज देणारं.

कुणीतरी असावं माझ्यावर टिका करणारं,
टिका करुन करुन मला सुधारणारं.

कुणीतरी असावं माझ्यावर प्रेम करणारं,
माझ्या जीवनात मला "friend" म्हणवणारं

Thursday, November 11, 2010

मैत्रिण असावी!.......

मैत्रिण असावी!
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी

Saturday, November 6, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी......

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

Monday, November 1, 2010

हर चहरे मे कुछ तोह एह्साह है.....

हर चहरे मे कुछ तोह एह्साह है,

आपसे दोस्ती हम यूं ही नही कर बैठे,

क्या करे हमारी पसंद ही कुछ "ख़ास" है. .

चिरागों से अगर अँधेरा दूर होता,

तोह चाँद की चाहत किसे होती.

कट सकती अगर अकेले जिन्दगी,

तो दोस्ती नाम की चीज़ ही न होती.

कभी किसी से जीकर ऐ जुदाई मत करना,

इस दोस्त से कभी रुसवाई मत करना,

जब दिल उब जाए हमसे तोह बता देना,

न बताकर बेवफाई मत करना.

दोस्ती सची हो तो वक्त रुक जता है

अस्मा लाख ऊँचा हो मगर झुक जता है

दोस्ती मे दुनिया लाख बने रुकावट,

अगर दोस्त सचा हो तो खुदा भी झुक जता है.

दोस्ती वो एहसास है जो मिटती नही.

दोस्ती पर्वत है वोह, जोह झुकता नही,

इसकी कीमत क्या है पूछो हमसे,

यह वो "अनमोल" मोटी है जो बिकता नही . . .

सची है दोस्ती आजमा के देखो..

करके यकीं मुझपर मेरे पास आके देखो,

बदलता नही कभी सोना अपना रंग ,

चाहे जितनी बार आग मे जला के देखो