Saturday, February 11, 2012

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर


मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर...

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात...
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात...
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात...

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात...

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला...

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री....

काही आठवणी विसरता येत नाहीत ....


काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत
गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल
शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो...............

Wednesday, February 1, 2012

Life is filled with possibilities.


Life is filled with possibilities.
That challenge us each day.....
To take a chance
Try something new........
See things in a different way
And as it's through,
We learn to change and grow
To explore who we are
And what we know
For it's not until we try
That we find out - what we can do