Monday, September 3, 2012

ओर्कुट


आहे तरी काय असं ओर्कुट मध्ये
कि रोज एकदा तरी लॉगीन करावसं वाटतं
काही असो न असो आपल्यासाठी तिथे
पण दिवसातून एकदा दरी चेक्क करावसं वाटतं

आधी मित्रांना request पाठवत राहायचं
Profile detail मध्ये भरत राहायचं
मित्रांचं network वाढवत राहायचं
नवीन communities join करत रहायचं
रोज हेच सगळं करत रहावसं वाटतं
आहे तरी काय असं ओर्कुट मध्ये
रोज एकदा तरी लॉगीन करावसं वाटतं

दूर कुठला तरी शाळेतला मित्रं
एखाद्या दिवशी Profile visit करून जातो
अचानक त्या शाळेतल्या आठवणी
मनात ताज्या करून जातो
शाळेतल्या त्या दिवसां मध्ये रमत रहावसं वाटतं
आहे तरी काय असं ओर्कुट मध्ये
रोज एकदा तरी लॉगीन करावसं वाटतं

नवीन नवीन photos रोज upload होतात
communities वर blogs रोज लिहिले जातात
आपल्या ब्लॉगला एखादा छानसा reply मिळेल
तो reply देणारी एखादी छानशी तरुणी असेल
तिच्याशी आपली मैत्री जुळावी असंच वाटत राहतं
आपलंही Relationship Status कधी तरी बदलावसं वाटतं
आहे तरी काय असं ओर्कुट मध्ये
रोज एकदा तरी लॉगीन करावसं वाटतं

!! जेव्हा तु हसते !!

!! जेव्हा तु हसते !!
बागेतल्या या फुलांना ही वाटेल हेवा
जेव्हा जेव्हा तु हसते अशी
गालावर माझ्या तु लाल ठसा ओठांचा द्यावा
मनात माझ्या इच्छा अशी
फुलातुन मधमाशीने जसा रस प्यावा
डोळ्यत माझ्या तु बघते अशी
तुझ्या छायेत पाण्याचा पेला थिजुन जावा
जरि असेल दुपारी शशी
जगाचा या सार्‍या मला विसर पडावा ?!!!!!
जेव्हा येतो मी तुझ्यापाशी
नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा
दररोज मला तु भेटते अशी
आत फक्त एकच प्रश्न वाटतो विचारावा
इतकी सुंदर तु दिसते कशी ????