Saturday, February 19, 2011

जय देव, जय देव, जय जय शिवराया ।

आज शिवजयंती . आपणा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.


जय देवजय देवजय जय शिवराया 
याया अनन्य शरणांआर्या ताराया  धृ 

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला 
आला आला सावध हो शिवभूपाला 
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला 
करुणारव भेदूनी तव हृदय  का गेला ॥१॥

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी 
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी 
ती पूता भूमाताम्लेंच्छा ही छळता 
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥

त्रस्त आम्ही दीन आम्हीशरण तुला आलो 
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो 
साधुपरित्राणायादुष्कृती नाशाया 
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला 
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला 
देशास्तव शिवनेरी घेई देहाला 
देशास्तव रायगडी ठेवी देहाला 
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला 
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥

स्वा.वीविनायक दामोदर सावरकर

No comments:

Post a Comment