Friday, March 11, 2011

विसरलास ना...

विसरलास ना त्या सगळ्या गोष्टी

आपण केलेल्या थट्टा मस्करी
त्यातूनही मी केलेली तुझी विनवणी
विसरलास ना......


मीच आठवण करून द्यायचे
मग हो.. हो.. करत तू आठवले म्हणायचे
आणि माझ्या बर्थ डे दिवशी चक्क
मैत्रिणीला शुभेच्छा द्यायचा........

जीव तू लावलास
पण एकजीव व्हायला विसरलास
हात मला तू दिलास
पण साथ द्यायला विसरलास

मी हिशोब ठेवला प्रत्येक दिवसाचा
तू क्षणाचाही विलंब नाही केलास
ते दिवस विसरायला........

विसरलास ना.....

No comments:

Post a Comment