Thursday, July 1, 2010

मॆत्री म्हणाली प्रेमाला....

मॆत्री म्हणाली
प्रेमाला....

बघुयात तरी कोण उतरतयं खात्रीला ?

प्रेमाने
पसरवली जादू.....
अल्लामंतर....कल्लामंतर....छूऊऊऊऊऊ.....

मंतरलेले
डोळे
.....
त्याला धुसरचं लागले दिसू
क्षणभर हासू.....
मात्र
खात्रीचे
आसू.


ठोके चुकलेले ह्रदय...
नि भुगा झालेला मेंदू
गणगोत
दुरावले
सारे....
स्वत:च स्वत:चा झाला शत्रु.

ख-या मॆत्रीची
मिळाली
जेव्हा
साथ...
ऊघड्ली अत्तराची कुपी
नि दरवळला अवघा आसमंत.

मॆत्रीची

पडली ही अशी
नाजूकशी सरगाठ.....
कुठ्ल्याचं मतभेदाला आता
तिथे
नसावी
वाट.

प्रेमाने पत्करली
विनाशर्त शरणागती...
कळत-नकळत
होते
ते प्रेम
पण कधीचं न तूटणारी ती खरी मॆत्री !!!

No comments:

Post a Comment