मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर
बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचय
नव्या वहिचा वास
घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचय
मला पुन्हा एकदा
तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नळाखाली हात
धरून पाणी प्यायचय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा,
बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट
खेळायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन
शालेला सुट्टी मिळेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित
मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा
व्हायला वेळ का असेना
मैत्रीणीशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घन्टा
होताच मैत्रीणीशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी
शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच
ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे, वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे
नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय.
मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय..
No comments:
Post a Comment